कुमठेच्या विदयालयात उलगडला प्रसारमाध्यमांचा इतिहास
दहावीच्या विद्यार्थ्यानी केली पत्रकारांची उलटतपासणी,
विदयालयात झाला पत्रकार संवाद ! देशाच्या परिस्थितीवर प्रसारमाध्यमांची
भूमिका महत्वाची असल्याची भावी पिढीच्या भावना
कुमठेच्या लोकनेते दिनकर आबा पाटील विदयालयात दहावीच्या विदयार्थ्यांनी साधला पत्रकारांशी "संवाद " या विशेष उपक्रमाचे आयोजन करणेत आले होते , उपक्रमशील शिक्षक पी ड़ी पाटील यांनी हा प्रत्यक्षात विदयार्थी व पत्रकार हा संवाद घडवून आणला .
दहावीच्या पुस्तकात प्रसारमाध्यमे व त्यांचा इतिहास हा धडा आहे
प्रसारमाध्यमांच काम काय व इतर माहिती सांगतो. मात्र सध्याच्या देशातील परिस्थितीला प्रसारमाध्यम जबाबदार आहेत का? सोशल मीडियाचा पत्रकारितेवर काय परिणाम झालाय? व देशाची अखंडता टिकावी यासाठी वृत्तपत्रे काय काम करतात? पत्रकारांच्यावर हल्ले का होतात ? लोकशाहीमध्ये पत्रकारांची भूमिका काय ? पत्रकारितेमध्ये तोटा आहे काय ?मानधन मिळते का ? जाहीरातच का घेतात ?
समाजप्रबोधनाच्या बातम्यांना पाहिल्या पानावर जागा का मिळत नाही ? बातमीची सत्यता पाहिली जाते का ? असे एक ना हजारो प्रश्न पडले होते देशाच्या भावी पिढीला..! कुमठे येथील लोकनेते दिनकर आबा पाटील विद्यालयातील दहावीच्या चिमुकल्या पोरांना.! संवाद पत्रकारांशी या कार्यक्रमात शनिवारी प्रश्नांचा भडिमार करत उलटतपासणी केली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक पी.बी.शिंदे,तासगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे व पत्रकार विनायक कदम दिलीप जाधव उपस्थित होते .
आजची प्रसारमाध्यम कोणती व त्यांचं कार्य व कामकाज कस चालत याची माहिती व्हावी यासाठी 10 वी च्या पुस्तकात प्रसारमाध्यम व इतिहास हा धडा आहे. यासाठी थेट पत्रकारांशी संवाद उपक्रमशील शिक्षक पी. डी.पाटील यांनी घडवून आणला. पेपर,पत्रकार व टेलिव्हिजन याविषयी असणाऱ्या प्रश्नांचा भडिमार पोरांनी
केला.बातम्यांची विश्वासार्हता कशी तपासली जाते? बातमी देताना भेदभाव केला जातो का? समाजप्रबोधनाच्या बातम्यांच प्रमाण कमी आहे, देशात फक्त एकाच पक्षाच्या बातम्या दिसतात, गुन्ह्यांच्या बातम्या किती द्याव्यात यावर यावर काही निर्बंध आहेत का? देशाची धार्मिक अखंडता ठेवायला पत्रकार काय करतात ? हे प्रश्न दहावीच्या चिमुकल्या पोरांना पडले होते.
देशात घडणाऱ्या विविध घटना व बदलांवर आमची भावी पिढी किती सजग आहे. चांगलं वाईट कळून त्यावर चूक बोलायचं धाडस या पोरां पोरींच्याकडे दिसलं.!अलीकडची पिढी ही समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटनेेवर लक्ष ठेवूनच असलेचे दिसते ; यामध्ये दिपक वडर,हर्षवर्धन भोईटे,प्रसाद भोसले,दिग्विजय यादव,पूजा तावडे,वसुधा काटकर,प्रणाली बेडगे,सायली मोरडे,गौरी जाधव,साक्षी पाटील,संजीवनी हजारे,सायली गाडे या हजरजबावी विदयार्थी विदयार्थीनींचे कौतुक करावे तेवढं थोडचं आहे ' पत्रकारांनीही मनमोकळेपणे तत्परतेने उत्तरे देत त्यांचं समाधान केलं.
कुमठेच्या शाळेत पी. डी.पाटील सारखे शिक्षक या शाळेत फक्त पोर घडवत नाही तर चांगला माणूस कसा घडावा हे शिकवतात भावी पिढी व त्यापुढील समस्या कशा असतील यााची जाणीव प्रत्यक्षात अंमलात आणणणारे प्रयोग या विदयालयात होत आहेत ' या देशाची मतदान यंत्रणा कशी चालते याच प्रात्यक्षित अगदी हुबेहूब त्यांनी निवडणूक घेऊन दाखवलं.! याची दखल जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी घेत कौतुक केलं.. त्याचबरोबर झाडांना राख्या बांधून पर्यावरणाचा संदेशही दिला गेला ' या संस्थेचे अध्यक्ष अविनाश काका पाटील यांच्या मार्गादर्शनाखाली या विदयालयाची वाटचाल सुरूआहे .या विशेष कार्यक्रमाचे स्वागत मुख्याधापक पी.बी. शिंदे यांनी प्रास्ताविक एस ए जाधव यांनी तर आभार एस जी जाधव यांनी मानले. या उपक्रमासाठी आयआयटीएस चे संचालक तानाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments