कुमठे ता तासगावच्या लोकनेते दिनकर आबा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ९ वी तील मुलांनी  विजया बँकेला भेट देऊन बँकेच्या  कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी विजया बँकेचे शाखाधिकारी एस एस खेतमाळस सर यांनी  विध्यार्थ्याना बँकेच्या कामकाजा ची माहिती विदयार्थ्यांना दिली.

या वेळी मुलांना खात्यांचे प्रकार, ठेवीचे प्रकार तसेच वेगवेगळे व्याजदर यांची माहिती दिली त्यानंतर विध्यार्थ्यानी बँकेची स्थापना कधी झाली?बँकेला विजया हेच नाव का दिले ? बँकेतील पैशाचे रक्षण कसे केले जाते?बँक कोणकोणत्या सुविधा देते ? असे अनेक प्रश्न विचारून बँकेची माहिती जाणुन घेतली.याचबरोबर बँकेचे सहाय्यक शाखाधिकारी  कैलाशकुमार व् रोखपाल  वी.एस.काटकर यानीही मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो ,शेती व्यवसाय कसा करायचा,आरोग्य यंत्रणा कशी चालते त्याचप्रमाणे बँकेचे कामकाज कसे चालते असे अनेक प्रश्न विध्यार्थ्याना त्यांच्या शालेय जीवनात पडत असतात पण त्याची उत्तरे कशी मिळणार याबद्दल विध्यार्थ्यात उत्सुकता असते यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील व ए एम पाटील  यानी प्रत्यक्षात क्षेत्रभेटीतुन शिक्षण हा उपक्रम राबिवल्यामुळे मुलाना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच.पण बँकेचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याविषयी दिशादर्शक माहिती मिळाली.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे सहकार्य मिळाले या उपक्रमाचे आयोजन  पी. डी पाटील  यांनी केले होते.