तासगाव तालुक्याचा पूर्व भागात द्राक्षबागाच्यां हजारो हेक्टर क्षेत्राला बदलत्या वातावरणचा फटका ! अनेक बागांना द्राक्षघडांचे प्रमाणअल्प ! बागामध्ये वांझ द्राक्षवेलींचे मोठे प्रमाण यामुळे याचा उत्पनावर मोठा परिणाम होणार असून या विभागाचे अर्थकारण बिघडणार आहे.आधीच दुष्काळ ! त्यात तेरावा महिन्या म्हणण्यांची वेळ द्राक्षबागायतदारावर आली आहे !



तासगांव तालुका हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो.या तालुक्याच्या पूर्व भागात द्राक्ष शेतीची मोठी लागवड केली जाते. 

मणेराजूरी,सावळज,कुमठे,सावर्डे,गव्हाण,योगेवाडी,बस्तवडे,अंजनी,नागेवाडी,उपळावी,व्रजचौडे,डोंगरसोनी हा भाग द्राक्ष शेतीचा मोठा पट्टा म्हणून ओळखला जातो.या द्राक्ष शेतीवरच या भागाचे अर्थकारण चालते.चालू हंगामात मात्र या विभागात जूनपासून काही अपवाद वगळ्या ता फार मोठा पाऊस झाला नाही आहे त्या थोडया पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या परंतु पेरल्या नंंतर मात्र या पावसाने दडी मारली की काही पिके फूट ते तीन फूटापर्यंत वाढली खरी परंतु तीच पीके आता कोमेजून वाळून गेली आहेत काही ठिकाणी तर पूर्णपणे करपून गेली आहेत अशा स्थितीच बागायतदारांनी द्राक्ष छाटण्या घेतल्या दरवर्षीप्रमाणे या विभागातील द्राक्ष फळ छाटण्या पावसाअभावी झाल्या नाहीत.दरवर्षी या भागातील छाटण्या या २० ऑगष्टपासून सुरु होत असतात. परंतु पावसाअभावी व नैसर्गिक वातावरणा मुळे या छाटण्या पुढे गेल्या सध्या या विभागातील  फळ छाटण्या पूर्ण झाल्या आहेत.

परंतु फळ छाटण्या झालेल्या द्राक्षबागामधून फेल बागा व वांझ द्राक्षवेलीचे प्रमाण चालू वर्षी मोठे आहे त्यामुळे अनेक द्राक्षबागामधून प्रत्येक झाडावर समप्रमाणात द्राक्ष घडांची संख्या दिसत नाही.त्याचा परिणाम एकूण द्राक्ष उत्पनांवर होणार आहे.उन्हाळयामध्ये द्राक्षबागांना कमी अधिक प्रमाणात मिळालेले पाणी वाढलेल्या तापमानवाढीचा परिणाम यामुळे द्राक्षवेली मध्ये गर्भधारणा झाली परंतु ती समप्रमाणात झाली नाही त्यामुळे अनेक द्राक्षबागा यामध्ये सापडल्या असून त्याचा थेट परिणाम द्राक्षबागांच्या घडसंख्येवर झाला 

आहे.प्रत्येक बागांचे एकूण उत्पन्न घटणार आहे त्यामुळे बागावर केलेल्या प्रचंड खर्चाचा ताळमेळ कसा लावयाचा या विवंचनेत या भागातील शेतकरी आहे.या विभागात आढळणाऱ्या प्रमुख जाती पैकी सुपर सोनाक्का या जातीच्या बागांमध्ये याचा मोठा फटका असलेचे बोलले जाते,तरअनुष्का,आरके,माणिकचमन,थॉमसन,सोनाक्का,शरद सिडलेस आदी जातीमध्ये याचे प्रमाण कमी अधिक 
प्रमाणात आहे .


गगनाला भिडलेले औषधांचे व मजूरींचे दर

द्राक्षशेतीचे उत्पन्न घेणे आता सोपे राहिले नाही कारण औषधांचे दरही जीएसटी मुळे प्रचंड वाढले आहेत ;दर्जेदार कंपन्यांच्या औषधाला मोठी मागणी असते.त्यातच बागेतील कामांना मजूर मिळनेसा झाले आहेत.वाढलेले द्राक्षाचे क्षेत्र यामुळे मजूरांची कमतरता जाणवू लागली आहे या विभागात उत्तर भारतातील उत्तरप्रदेश,बिहार आदी राज्यातून सुमारे पाच ते दहा हजार मजूर बागेत मजूरीसाठी दरवर्षी येत असतात.त्यांना देणेत येणारी मजूरीतही वाढ झाली आहे .



चालू वर्षी या विभागाचे अर्थकारण बिघडणार

भरवश्याचे व चांगले आर्थिक  उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्ष च्या शेतीकडे वळले.पारंपारिक ऊस,हळद,गहू,ज्वारी,सोयाबीन या पिकांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची मोठी लागवड केली आहे.याच बागामुळे या विभागाचे अर्थकारण चांगलेच सुधारले आहे.परंतु चालू वर्षी वाढलेल्या तापमनाचा मोठा फटका द्राक्ष शेतीवर झालेचे चित्र आहे.त्यामुळे उत्पन्न घटणार आहे याचा फटका उधार औषधे विक्री केलेल्या शेती सेवा केंद्रांना.बँकांना सोसायट्यांना बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि द्राक्ष उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना बसणेची चिन्हे आहेतं .सध्या द्राक्षबागांचे उत्पन्न घेवून त्यांचे हातात पैसे येेईपर्यंत मोठा खर्च करावा लागत आहे परंतु बागामध्ये घडच कमी असल्याने होणारा खर्च तेवढाच पण उत्पन्न मात्र कमी असे एकूण चित्र असणार आहे .


एकूणच चालू वर्षी या विभागातील फळ छाटण्या लांबल्यामुळे अनेक फेल बागामुळे जानेवारी  फेब्रुवारी दाखल होणारीअवीट गोडीची द्राक्षे यंदा बाजारपेठेत वेळेत दाखल होणार नसलेच चित्र आहे.