मणेराजुरीतील पालकांच्या लोकवर्गणीतून जि.प. रामलिंगनगर शाळेचे रूपडच पालटले 'गाव ' करील ते 'राव ' काय 'करील ' या म्हणीप्रमाणे पालकांनी दिले पाच लाखांचे दान शाळेनेही या दानशूर पालकांचा सन्मानपत्र व सत्कार करून त्यांचा गौरव केला.

 GoNewsBook | Local News


गावापासून अगदी हाकेच्य अंतरावर जि.प शाळा रामलिंग नगर आहे या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यत शिक्षण दिले जाते . येथील शिक्षक व पालकांनी तन , मन ' धन ' या शाळेसाठी अर्पण करुन ही शाळा तालुक्यात आदर्श बनली आहे खाजगी इंग्रजी मिडियमच्या शाळेला लाजवेल असं या शाळेच रुपड झाला असून या शाळेच्या भिंतीही आता बोलक्या झाल्या आहेत .ज्ञानरचनावादी शाळा,डिजिटल स्कूल , वॉल कंपाऊंड अशी अत्याधुनिक कामेही देणगीदारांच्या लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आली आहेत . शाळेच्या शिक्षकांनी रामलिंगनगर परिसरातील  रामलिंगनर 'एरंडोले मळा 'लांडगे मळा 'एकूंडे मळा . 'अप्पा गुणे मळा  निंबोळका मळा 'सिद्धेश्वर नगर 'येथील पालकाना व  ग्रामस्थांना समाज प्रबोधन करून शिक्षण व शाळा अत्याधुनिक करण्याचे महत्त्व सांगून ग्रामस्थामधून शैक्षणिक मदतीचा उठाव केला याला पालकांनी ही मोठी साथ दिली व बघता बघता सुमारे पाच लाख रूपयाचा देणगी रुपी दान शाळेसाठी पालकांनी दिले .

१ली ते ७वी पर्यंतचे वर्ग असलेली शाळा असून शाळेचा पट १६७ असणारी जिल्हयातील एकमेव वस्तीवरील शाळा आहे.या शाळेत गाव भाग भोसले नगर सुमारे १ किमी  परिसरातून मुले येतात .या पालकांच्या देणगीतुन सर्व वर्ग डिजिटल प्रत्येक वर्गाला अॅन्ड्राइड टिव्ही( ४० इंची ) वर्गानुसार सॉफ्टवेअर इन्स्टॉल शालेय कंपाऊंड सुशोभिकरण अशी विविध छोटी मोठी कामे करण्यात आली.

या शाळेची प्रमुख वैशिष्टे

१) इ .१ली पासून स्पर्धा परीक्षा तयारी.

२ ) रविवारी , सुट्टीच्या दिवशी विशेष मार्गदर्शन.

३ ) क्रीडा स्पर्धा जिल्हा पातळीवर यश.

४ ) कला , कार्यानुभव व शारीरक शिक्षण मार्गदर्शन .

५ ) इंग्रजी व गणित विशेष तयारी अश्या पध्दतीने मुलांची तयारी करून घेतली जाते.

 GoNewsBook | Local News


यावेळी  एका विशेष कार्यक्रमात सर्व देणगीदारांचे सन्मानपत्र देवून जि.प. सदस्य सतीश पवार व  प्रदीपकुमार कुडाळकर गटशिक्षणधिकारी यांच्या हस्ते सत्कार करणेत आला . यावेळी दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी शाळेचे भरभरून कौतुक केले व देणगीदार पालकांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक लक्ष्मण शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक  संभाजी वावरे यावेळी शाळेच्या वतीने मनोजकुमार मुळीक, सुरेश माळी व सुनिता एडके यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संजय जमदाडे, पं.स. सदस्य अमोल माळी सदस्य पं.स. तासगांव  स्वाती लांडगे माजी सभापती तासगांव  सदाशिव कलढोणे सरपंच मणेराजुरी अवधूत शिंदे उपसरपंच शिवाजी पवार माजी चेअरमन शि. बँक सांगली संपतराव लांडगे चेअरमन वि. का. स. सोसायटी आर.एस. कांबळे केंद्रप्रमुख , मणेराजुरी विशाल जमदाडे ग्रामपंचायत सदस्य मणेराजुरी सौ. जयश्री जमदाडे ग्रामपंचायत सदस्य मणेराजुरी सौ . जयश्री एरंडोले ग्रामपंचायत सदस्य  नानासो जमदाडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मोहन जमदाडे उपाध्यक्ष शा. व्य. समिती यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित होते शेवटी आभार कुमार माने यांनी मानले.